येलघोल व बेडसे लेणीवर एकजूट ची कार्यशाळा संपन्न
पुणे : एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह ,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक प्रमुख सारिशजी डोळस उर्फ दादुस सर यांनी आयोजित केलेली बेडसे लेणी व येलघोल लेणी ,तालुका मावळ ,जिल्हा पुणे येथे दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी कार्यशाळा व धम्म सहल संपन्न झाली. बेडसे लेणी येथे धम्म लिपी शिक्षक आयु. बबन आनंद ओव्हाळ, मैत्रेय बुद्ध विहार भांडुप यांनी सामुदायिक वंदना घेतली, त्यावेळी आपल्या शब्दाचे उच्चार कसे स्पष्ट असले पाहिजे व त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो याची माहिती दिली. आदरणीय दादुस डोळस सर यांनी लेणी संवर्धन करणे ही काळाची गरज आहे याविषयी आपली तळमळ व्यक्त केली. राजू भालेराव, लेणी अभ्यासक, पुणे यांनी स्थापत्य, कला तसेच पाली भाषेचे महत्व सांगितले. महाराष्ट्र शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या लेणी मार्गदर्शक यांनी बेडसे लेणीची संक्षिप्त माहिती दिली. येलघोल लेणी वर ओव्हाळ सर यांनी लेणी विषयी माहिती दिली. तसेच राजू भालेराव सर यांनी लेणी लगत असलेल्या धबधब्याचा प्रवाह पार करून येण्यासाठी तेथे लोक वर्गणीतून तातडीने मोरी तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सदर कार्यशाळेत अबाल वृद्धांपासून स्थानिक सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. बबन भिंगारदिवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटची धम्मपालन गाथा घेऊन कार्यशाळा अत्यंत उल्हासात संपन्न झाली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0