आधार प्रतिष्ठानच्या मानाच्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा जल्लोष

Sep 5, 2026 - 23:50
Sep 5, 2026 - 23:52
 0  62
आधार प्रतिष्ठानच्या मानाच्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा जल्लोष

मिरारोड (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित आधार प्रतिष्ठानच्या वतीने जरीमरी तलाव, काशिमिरा, मिरारोड येथे सलग पाचव्या वर्षी मानाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी दहीहंडीला सलामी देणाऱ्या विविध गोविंदा पथकांना आयोजकांच्या वतीने भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण ठरले ते भैरवनाथ सुपरस्टार खालू बाजा आणि सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौरी जाधव यांचे सादरीकरण. त्यांच्या ढोल-ताशांच्या आणि लावणीच्या ठेक्यावर उपस्थित गोविंदा पथकांसह नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिरा-भाईंदर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांना तसेच आयोजकांना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा आयोजक तथा आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सावंत यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे दमदार सूत्रसंचालन करत समाजसेवक किरण मांजरेकर यांनी आपल्या खास शैलीत उपस्थित गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. त्यांच्या उत्स्फूर्त निवेदनामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच आधार प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गोविंदा पथकांचा उत्साह यामुळे यंदाचा मानाचा दहीहंडी उत्सव अविस्मरणीय ठरला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0