लढणार आणि जिंकणार, भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार अनिल भोसले यांचा निर्धार
मीरारोड : भारतीय जनता पक्षाचे गेली अनेक वर्षे एकनिष्ठीने काम करणारे नेते अनिल भोसले यांचे मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने प्रभाग क्रमांक 14 मधून तिकीट कापल्यामुळे अनिल भोसले यांनी भाजपाशी बंडखोरी करत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. पक्षाकडून अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली जात होती. परंतु पक्षाच्या विरोधात जावून अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेता आता अन्याय सोसायचा नाही, बदला घ्यायचा विकासाने! लढणार आणि जिंकणार असा निर्धार केला आहे. अनिल भोसले 32 वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय कार्य केल्यामुळे त्याच्या पाठीशी मोठा जनाधार उभा राहिला आहे. अनिल भोसले प्रभाग 14 ड मधून असून त्यांच्या सोबत अपक्ष उमेदवार कविता भोये प्रभाग क्रमांक 14 ब मधून असल्याने दोन्ही उमेदवारांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे भाजपाकडून तीन वेळा निवडून आलेली नगरसेविका मिरादेवी यादव यांना पुन्हा तिकीट देण्यात आले असून सोबत माजी महापौर ज्योस्तना हसनाले यांना निवडणुकीत उतरवले आहे. या प्रभागात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असून अपक्ष उमेदवार अनिल भोसले आणि अपक्ष उमेदवार कविता भोये भाजपाचे स्वप्न भंग करणार अशी प्रभागात परिस्थिती आहे. अपक्ष उमेदवार यांना निवडणुकीत मतदारांचा वाढता प्रतिसाद भाजपची डोकेदुखी ठरत आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1