कर्तव्यनिष्ठ अशोक जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान

May 12, 2026 - 13:08
 0  1
कर्तव्यनिष्ठ अशोक जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान

मिरारोड (प्रतिनिधी): शासकीय सेवेमध्ये ३२ वर्षे प्रामाणिक, निष्ठावान आणि समर्पित सेवा देत शासकीय वाहन चालक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मिरा रोड येथील अशोक यदुराव जाधव यांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नुकताच मंत्रालयात करण्यात आला.

कामाप्रती एकनिष्ठ व प्रामाणिक सेवेसाठी झालेला त्यांचा सन्मान हा त्यांच्या कष्ट, त्याग आणि सेवाभावाचा खरा गौरव आहे. तसेच २० हून अधिक आयएएस अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा त्यांना लाभलेला प्रदीर्घ अनुभव त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि विश्वासार्हतेची साक्ष देतो. या प्रसंगी जाधव यांचे कुटुंबीय, सर्व उच्च अधिकारी व मंत्रालयातील कर्मचारी उपस्थित होते.  त्यांच्या या सन्मानाबद्दल अशोक जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0