मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी SVEEP पथकाची आढावा बैठक
भाईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज शुक्रवार, दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) पथकाची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. नवमतदार, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदार यांचा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.
मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत योग्य माहिती देणे, मतदान केंद्रांबाबत जागरूकता निर्माण करणे, सोशल मीडिया, प्रत्यक्ष संपर्क मोहिमा, पोस्टर, बॅनर, व्हिडिओ संदेश तसेच विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने निर्भय व उत्साहाने मतदान करावे, या उद्देशाने SVEEP पथकाच्या माध्यमातून प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0