मिरा भाईंदरमध्ये रंगले उठाव कवी संमेलन

Mar 8, 2026 - 21:14
Mar 8, 2026 - 21:16
 0  6
मिरा भाईंदरमध्ये रंगले उठाव कवी संमेलन

भाईंदर : धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समिती मीरा-भाईंदर आयोजित उठाव कवी संमेलन शनिवार दि. ७ मार्च रोजी उत्साहात पार पडले. रामदेव पार्क स्थित धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार येथे पार कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध कवी प्रा. उत्तम भगत यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून सा. मिशन जनकल्याचे संपादक राजेश जाधव व प्रबुद्ध विचार मंचाचे अध्यक्ष विद्याधर किरतावडे उपस्थित होते.

यावेळी उठावचे ज्येष्ठ कवी बबन सरवदे यांनी समयसूचकतेनुसार कवितांच्या ओळी सादर करत सूत्रसंसंचालन केले. संमेलनात गझलकार गजानन गावंडे, राजरत्न राजगुरू, प्रा. सुमित गुणवंत, श्याम बैसाणे, वसंत वाघमारे, अशोक चाफे या निमंत्रित कवींनी आपल्या आंबेडकरी चळवळीच्या कविता सादर केल्या. गझलकार गजानन गावंडे यांनी सादर केलेल्या होत गेला रोज राडा चळवळीचा...या गझलेला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी चळवळीला गती देण्याची आवश्यकता जवळपास सर्वच कवींनी आपापल्या कवितेतून अधोरेखित केली. 

यावेळी मिरा भाईंदर मधील रमाबाई तायडे, विद्यासागर सुरवसे, सिद्धार्थ वानखडे, चंद्रमणी मनवर, प्राचार्य रमेश वाघमारे, प्रा. भीमराव पेटकर, पुष्पलता बडगे, स्नेहा वानखडे, उज्वला भगत, अंजली भगत, राजेश बडेकर, प्रा. उद्धव वाघमारे, विलास जाधव, बी. एम. जाधव आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. सर्व सहभागी कवींचा सन्मानपत्र, पंचशिल स्कार्फ, पेन आणि नोंदवही देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे राजेश बडेकर, विलास जाधव, महानंद बडगे, प्रदीप कांबळे, सुनील जाधव, लहू तायडे, तिलोत्तमा वाळके , दिलीप सुरडकर, पवन शिंदे, नारायण थोटे, सचिन सकपाळ, सचिन शिंदे, महेंद्र मोहिते आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील धापसे यांनी केले. कवी संमेलनाला मिरा भाईंदर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. अशा कवी संमेलनाची आवश्यकता असल्याची अशी भावना उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0