मिरा भाईंदर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध पदांवर पदोन्नती

Aug 18, 2026 - 14:38
 0  1
मिरा भाईंदर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध पदांवर पदोन्नती

भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने विविध पदांवर पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात आली असून, दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या सेवाकाळातील कामगिरी, अनुभव आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेऊन पदोन्नतीच्या माध्यमातून त्यांना अधिक जबाबदारीची पदे सोपविण्यात येत आहेत. पदोन्नतीमुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक प्रभावीपणे जबाबदारी पार पाडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या पदोन्नतीच्या कार्यवाही अंतर्गत महापालिका उपसचिव श्री. दिनेश कानगुडे यांना महापालिका सचिव पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच स्वच्छता अधिकारी श्री. अरविंद चाळके यांना उप मुख्य स्वच्छता अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अग्निशामक श्री. सतीश चौधरी आणि  श्री. एकनाथ पाटील यांना अग्निशमन प्रणेता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले श्री. विवेकानंद भोईर, श्री. राजेश भोईर, श्री. धाऊ शिद (दिव्यांग), श्री. विनोद सामंत, श्री. गजानन भोसले आणि श्री. हेमंत हंबीर यांना कार्यालय अधिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

पदोन्नतीचे आदेश प्रदान करताना महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी सर्व पदोन्नत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्नती ही केवळ सेवाश्रेणीतील बदल नसून त्यासोबत अधिक जबाबदारी आणि कार्यक्षमतेची अपेक्षा वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सदर पदोन्नतीचे आदेश प्रदान करतेवेळी उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, सभापती, स्थायी समिती श्री. हसमुख गहलोत, उपायुक्त (मु.) डॉ. सचिन बांगर, उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0