लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
मिरारोड : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या जयंती सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी ‘थोरांची गाथा’ या नाट्यप्रयोगाचेही सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाला परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक, सचिन साठे, कुसुमताई गोपले, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता, माजी महापौर तथा नगरसेविका निर्मला सावळे, शिक्षण व क्रीडा समिती सभापती तथा नगरसेविका स्नेहा पांडे, नगरसेविका आकांक्षा विरकर, नगरसेवक अनिल भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश गोडांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश चव्हाण, देवानंद रोडगे, रमेश लोखंडे, विजया पवार, सुरेश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा जागर करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0