भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या - दादाभाऊ अभंग
मुंबई : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्याच्या उभारणीसाठी आवश्यक जागा कायदेशीर प्रक्रिया राबवून ताब्यात घ्यावी, अशी मागणी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाठ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष तथा कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या नेतृत्वाखाली व मुख्य समन्वयक अतिशभाई खराटे यांचे प्रमुख उपस्थितीत ही भेट घेण्यात आली. विजयस्तंभाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यासाठी शासनाने आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन अस्वारे, महासचिव प्रवीण भोटकर, मुंबई अध्यक्ष संजय धावरे, पालघर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, आणि पालघर तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री शिरसाठ यांच्याकडून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी तात्काळ शेरा मारून योग्य त्या कार्यवाहीसाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे निवेदन पाठविले. त्यामुळे विजयस्तंभाच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या मागणीसंदर्भात पुढील प्रशासकीय कार्यवाहीकडे शिष्टमंडळाचे लक्ष लागले आहे.
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि त्यासाठी आवश्यक जागा कायदेशीर प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून घ्यावी, या मागणीसाठी समितीने शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0