भारतीय संविधानाची प्रत भेट देत अनोख्या पद्धतीने साजरा झाला मंगल परिणय सोहळा

Jun 29, 2026 - 15:00
 0  25
भारतीय संविधानाची प्रत भेट देत अनोख्या पद्धतीने साजरा झाला मंगल परिणय सोहळा

बोरिवली : समाजात भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याचा प्रेरणादायी संदेश देणारा एक अनोखा मंगल परिणय सोहळा रविवारी दि. 21 जून 2026 बोरिवली येथे उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात वधू दीपिका, या वंदना सुभाष लहाने व ॲड. सुभाष गोधू लहाने यांच्या कन्या असून, वर अक्षय, हा ज्योती दीपक कांबळे व दीपक कृष्णा कांबळे यांचा सुपुत्र आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षी ठेवून बौद्ध पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

या मंगल प्रसंगी उपस्थित विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुण्यांना दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. विवाहासारख्या मंगल प्रसंगी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

समाजात संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या या अभिनव उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून, विवाह सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा आदर्श मंगल परिणय सोहळा ठरला आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0