महापौर डिंपल विनोद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मनपा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका येथे महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मनपा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी नागरिकांच्या आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा तसेच शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मिरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात PET Scan तपासणी केंद्र सुरू करण्याबाबत तसेच PPP तत्त्वावर सुरू असलेल्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल संदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा आपल्या शहरातच उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.
तसेच मनपा शाळांसह शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि सकारात्मक पावले उचलावीत, याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
मिरा-भाईंदरमधील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्यसेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक नागरी सुविधा मिळणे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकहिताच्या प्रत्येक विषयावर सातत्याने पाठपुरावा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी माननीय उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील जी, स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत जी, आरोग्य व वैद्यकीय आरोग्य समिती सभापती श्री. मधुसुदन पुरोहित जी, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती श्रीमती. स्नेहा पांडे जी, आयुक्त श्री. राधाविनोद शर्मा जी, अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, डायग्नोस्टिक अधिकारी, डॉक्टर तसेच शाळांचे ट्रस्टी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0