मिरा भाईंदरमध्ये ड्रग माफियांना रोखण्यासाठी शिवसेनेच्या युवासेनेमार्फत विशेष अँटी-ड्रग स्क्वॉड तयार

Jan 13, 2026 - 10:23
 0  1
मिरा भाईंदरमध्ये ड्रग माफियांना रोखण्यासाठी शिवसेनेच्या युवासेनेमार्फत विशेष अँटी-ड्रग स्क्वॉड तयार

मिरारोड (प्रतिनिधी): मिरा-भाईंदर शहरात ड्रग माफिया व पेडलर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे चित्र असून, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या युवासेनेमार्फत विशेष अँटी-ड्रग स्क्वॉड तयार करण्यात आला आहे. ही स्क्वॉड ड्रग पेडलर व ड्रग माफियांविरोधात माहिती संकलन, जनजागृती आणि तातडीने प्रशासनापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करेल अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात असे निदर्शनास आले आहे की सामान्य नागरिक हे ड्रग्स, गरदुल्ले आणि चरस गांज्याची विक्री करणाऱ्या लोकांपासून अत्यंत त्रस्त झालेले आहेत. शहराच्या सुरक्षेच्या आणि तरुण पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. सध्या ड्रग्सचं लोण हे संपूर्ण मिरा भाईंदरमध्ये पसरत चाललं आहे. त्यामुळे येणारी पिढी या ड्रग्सच्या विळख्यात सापडू नये यासाठी यावर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात ड्रग्सच्या व्यापऱ्यांवर कुठेतरी अटकाव करावा यासाठी युवासेनेच्या माध्यमातून अँटी ड्रग्स स्क्वॉडची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी शहरातील २४ प्रभागातून प्रत्येकी एक असे २४ पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच या युवा स्क्वॉडचा हेल्पलाइन नंबर ९९३०८८७५७८ जनतेसाठी सुरू करण्यात आला असून ही हेल्पलाइन २४ तास उपलब्ध राहणार आहे.  याबाबतीत मी मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त आणि पोलिस निरीक्षक यांच्यासोबत चर्चा करण्यात आली असून पोलिस त्यांच्या पातळीवर कारवाई करत आहे. तसेच शासनसुद्धा यावर गंभीर असून ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्का सारख्या कडक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना कॅबिनेट बैठकीत देण्यात आल्या आहेत असे ही म्हटले आहे. 

तुम्हाला जर कोणी ड्रग पेडलर दिसला किंवा कुठे ड्रग्सचं सेवन करणारे व्यक्ती दिसले तर त्यांच्या विरोधात ९९३०८८७५७८ या हेल्पलाइन नंबर वर तक्रार करू शकतात. युवासेनेचे ड्रग्स स्क्वॉडचे सदस्य तत्काळ त्याठिकाणी पोहचून आवश्यक कारवाई करतील असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0