मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग रचना ही 2024 च्या मतदार नोंदणी व लोकसंख्येवर आधारित हवी - माजी आमदार मुझफ्फर हुसैन
प्रभाग रचनेला काँग्रेसचा आक्षेप
मिरारोड : आगामी मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली वॉर्ड वाईज प्रभाग रचना ही सन 2011 ची लोकसंख्या व चुकीच्या पद्धतीने केली गेल्याने प्रदेश काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी त्याला आक्षेप घेतला आहे. राज्य निवडणूक आयोग, मुख्य सचिव नगरविकास खाते तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदना द्वारे आक्षेप नोंदवत काही प्रश्न उपस्थित करीत प्रभाग रचना ही 2024 च्या मतदार नोंदणी व लोकसंख्येच्या आधारावर करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेली प्रभाग रचना ही 2011 म्हणजेच 14 वर्षांपूर्वीची जुनी जनगणना संख्या गृहीत धरून करण्यात आली आहे. सन 1991 च्या जनगणने नुसार शहराची लोकसंख्या 1,75,605 होती तेव्हा नगरसेवक संख्या 67 होती. सन 2001 मध्ये लोकसंख्या 5,20,388 झाल्याने नगरसेवक संख्या वाढून 95 करण्यात आली. सन 2011 च्या जनगणना नुसार लोकसंख्या 8,09,378 झाली तरी नगरसेवक संख्या तीच म्हणजे 95 होती. सन 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते परंतु कोविड-19 चे कारण देत पुढे ढकलण्यात आली, अद्यापपर्यंत ती झालेली नाही. मिरा भाईंदर शहर क्षेत्र 145- विधानसभा व 146 ओवळा माजिवडा विधानसभा अर्धा भाग असे मिळून बनले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत साधारपणे 8 लाख 50 हजार मतदार नोंदणी झाली होती. मिरा भाईंदर ची विद्यमान लोकसंख्या 15 लाख पेक्षा जास्त झाली असली तरी नगरसेवक संख्या तीच म्हणजेच 95 ठेवण्यात आली आहे. ती वाढविण्याची गरज आहे. तसेच सन 2024 च्या मतदार नोंदणी नुसार नव्याने प्रभाग रचना होणे अपेक्षित होते. प्रत्येक वॉर्ड हा साधारण पणे 30 ते 35 हजार लोकसंख्येचा असावा. यु. डी. सी. पी. आर. च्या नॉर्म नुसार लोकसंख्या वाढीमुळे क्षेत्रफळ वाढेल, भविष्यात लोकसंख्या वाढणार हे गृहीत धरून वॉर्ड ची रचना करणे गरजेचे आहे, आदी मुद्दे निदर्शनास आणून देत प्रभाग रचनेला आक्षेप घेण्यात आल्याचे मुझफ्फर हुसैन म्हणाले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0