दिशा महाराष्ट्राची आयोजित पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला गेला गौरव
नवी मुंबई: 'दिशा महाराष्ट्राची' आयोजित १४ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, सानपडा, नवी मुंबई येथे प्रथमच राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष म्हणून चंद्रकांत जगताप तसेच कवी संमेलन अध्यक्ष म्हणुन कोकणातील सुप्रसिद्ध साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. विशाल माने, संगीता जुमडे, ऍड. पूजा कांबळे, साहित्यिक नरेंद्र पवार, राजेंद्र शेलार तसेच गौतम नेवरेकर यांची उपस्थिती होती. दिप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यकाराची सुरुवात झाली. कवी संमेलन सुरु होण्यापूर्वी दिशा महाराष्ट्राची या युट्युब आणि वेब पोर्टलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना करून प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुष्पगुछ तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
कवी संमेलनाला महाराष्ट्रातून ऐकून ३० कवी सहभागी झाले होते. त्यांनी सुंदर अशा वेगवेगळ्या विषयावर कविता सादर केल्या. त्यांना पेक्षकांनी अपेक्षित साथ देखील दिली. कवी संमेलन अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित साहित्यिकांना अनमोल असे मार्गदर्शन केले आणि लिखाणास शुभेच्छा दिल्या. सन्मान सोहळ्यात ऐकून ३७ मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजात निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या ३ सामाजिक संस्थांचा देखील सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आम्ही कोकणकर या संस्थेस राज्यस्तरीय आदर्श कोकणी युवा संघटना पुरस्कार २०२५, मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान यांना राज्यस्तरीय आदर्श युवा संघटना पुरस्कार २०२५ तसेच संगमरत्न फाउंडेशन यांना राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना पुरस्कार २०२५ या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0