मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत वंचितचे 15 उमेदवार प्रस्थापित राजकीय पक्षांचे गणित बिघडवणार?

Jan 9, 2026 - 20:49
 0  24
मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत वंचितचे 15 उमेदवार प्रस्थापित राजकीय पक्षांचे गणित बिघडवणार?

भाईंदर (प्रतिनिधी) : मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी युती किंवा आघाडी न करता स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. परिणामी मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली असून नवख्या वंचित बहुजन आघाडीने 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांचे गणित बिघडवणार असल्याचे दिसून येत आहे. यंदाचा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरिने ग्रासलं असल्याने वंचित फॅक्टरकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपने २४ माजी नगरसेवकांची तिकिटे कापल्याने पक्षात बंडखोरी उफाळून आली आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडून होत असलेली मनधरणी झुगारून ८ बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तिकीट कापलेले माजी नगरसेवक यांची नाराजीमुळे भाजपच्या उमेदवारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तर शिवसेना फुटीमुळे शिवसेनेची ताकद विखारली गेले आहे हिच परिस्थिती राष्ट्रवादी पक्षाची झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसने बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन मोचक्याच जागा लढवत आहे. त्यात एम आय एम काँग्रेसची नयानगर प्रभागातील पारंपरिक मते घेण्याची शक्यता आहे. एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून वंचित फॅक्टरकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0