मिरा-भाईंदर शहरात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक केंद्राचे लोकार्पण संपन्न

Nov 11, 2025 - 13:41
Nov 11, 2025 - 13:42
 0  1
मिरा-भाईंदर शहरात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक केंद्राचे लोकार्पण संपन्न

भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे  महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या शुभहस्ते जेष्ठ नागरिक केंद्राचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकारलेले हे केंद्र म्हणजे केवळ विरंगुळ्याचे ठिकाण नसून, जेष्ठांच्या जीवनात नवचैतन्य फुंकणारा एक सामाजिक उपक्रम आहे अशी भावना जेष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जेष्ठांसाठी तयार करण्यात आलेल्या या केंद्रात पारंपरिक खेळ, ऐतिहासिक माहिती, जुन्या गाण्यांचा संग्रह, आरोग्यविषयक सुविधा आणि छोट्या गटासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची सोय अशा अनेक उपक्रमांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

या केंद्राच्या माध्यमातून मिरा-भाईंदरमधील जेष्ठ नागरिकांना समाजात पुन्हा एकदा सक्रिय भूमिका बजावण्याची, संवाद साधण्याची आणि आपल्या छंदांना नवी दिशा देण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “मिरा-भाईंदर हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. या शहराच्या प्रगतीसोबतच आपल्या जेष्ठांचा सन्मान, त्यांचं समाधान आणि आनंद कायम ठेवणं हेच आमचं कर्तव्य आहे. जेष्ठांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवणं हीच आमच्यासाठी खरी सामाजिक बांधिलकी आहे. जेष्ठांच्या अनुभवानं आणि आशीर्वादानं समाज अधिक समृद्ध होत असतो, या जाणिवेतून साकारलेले हे “जेष्ठ नागरिक केंद्र” मिरा-भाईंदरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.”

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0